नवी दिल्ली। अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या कार्यकाळात अच्छे दिन अजून दूरच असून सध्या प्रवाशांना बुरे दिन बघावे लागत आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची ट्रेन आता उशिरा धावताना दिसत आहेत. तेही थोड्या थोडक्या नाही तर हजारो गाड्या 15 तासांपेक्षा लेट झाल्या आहेत. एका अहवालानुसार 2017 मध्ये 2015 च्या तुलनेत गाड्या 15 तासापेक्षा अधिक लेट होण्याच्या प्रमाणात तिप्पट वाढ झाली आहे. 2015 मध्ये ट्रेन 15 तासांपेक्षा लेट होण्याची संख्या ही 479 होती. तर 2017 मध्ये हे प्रमाण वाढून 1137 झालं आहे. यात देशातील महत्त्वाची ट्रेन शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसचाही समावेश आहे. ट्रेन सुविधा डॉट कॉम या वेबासाईटने तयार केलेल्या अहवालानुसार 2017 मध्ये राजधानी एक्सप्रेस 53 वेळा, शताब्दी एक्सप्रेस 19 वेळा, गरीब रथ 46 वेळा, तर सुपरफास्ट एक्सप्रेस 86 वेळा आणि एक्सप्रेस ट्रेन 451 वेळा उशिरा पोहोचल्या आहेत.
2017 मध्ये 15 तासांपेक्षा अधिक उशीर लावणार्या गाड्यांची संख्या 1337 होती जी 2016 मध्ये 430 होती. तर 10 तासांपेक्षा उशिरा चालणार्या ट्रेनची संख्या 2017 मध्ये 4613 होती तर 2016 मध्ये 2641. दोन तासांपेक्षा जास्त उशिरा धावणार्या ट्रेनची संख्या 2017 मध्ये 9564 आहे तर 2016 मध्ये ही प्रमाण 7441 इतके होते.
वेबसाईटने उशिरा धावणार्या टॉप टेन ट्रेनची लिस्ट जाहीर केली आहे. यात सात ट्रेन या फक्त बिहारमधून जातात किंवा बिहारमधल्याच आहेत. यात बिहार जाणारी स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. ही ट्रेन 1 जानेवारी 2017 ते 31 मार्च 2017 या कालावधीत 80 वेळा धावली आणि प्रत्येक वेळी ही ट्रेन लेट होती.
ही ट्रेन राजस्थानच्या श्रीगंगानगरहून यूपी बिहार करत पश्चिम बंगालच्या हावडा इथे जाते. 80 दिवसांपैकी 32 दिवस ही ट्रेन 15 तासांपेक्षा अधिक वेळा लेट होती. बरैनी-ग्वालियर मेल ही 61 दिवसांपैकी 60 दिवस लेट चालली. तर यूपी संपर्क क्रांती एक्सप्रेस ही 67 दिवसांपैकी 37 दिवस उशिराने धावली होती.