सुलभ शौचालय योजनेत भ्रष्टाचार करणार्‍यांना शासन करा

0

नवापुर। पंतप्रधान घरकुल आवास योजना व स्वच्छ भारत योजने अंतर्गत सुलभ शौचालय व पेसा कायदा अंतर्गत देण्यात येणार्‍या निधीत बंधारे ता. नवापुर या गावात झालेल्या भ्रष्टाचाराबाबतचे निवेदन आज तहसिलदार प्रमोद वसावे यांना देण्यात आले. यावेळी बंधारे गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, बंधारे गावासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार्‍यां विविध योजनांसाठी देण्यात येणार्‍या निधींमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला असुन त्याची योग्य ती चौकशी शासना मार्फत अ‍ॅडीट (तपासणी) होवून भ्रष्टाचार करणार्‍यांना योग्य ते कडक शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली.

एकाच लाभार्थ्यांला दोनदा लाभ
यादी क्रमांक 1 मधील अनु क्र.6 दलसिंग बी.नाईक यांचा नमुना नं.8 नसुन त्यांना घरकुलांचा लाभ देण्यात आलेला आहे. अनु क्र 32 सुरेंद्र यशवंत वसावे यांचा नमुना नं 8 नसुन त्यांचा घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे.अनु क्रं 1 अमित व्ही. गावीत, अनु. क्र. 8 दिलीप बी.वसावे यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत व पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचा दोनदा लाभ देण्यात आलेला आहे.

ऑनलाईन यादीत भ्रष्टाचार
बंधारे या गावातील गरीब व अशिक्षित आदिवासी समाजाचे लोक राहत असुन त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच व इतर योजना राबविणार्‍या कर्मचार्‍यांनी केलेली फसवणूक निर्दशनास आणुन दिलेल्या असुन आमची फसवणुक केली जात असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल पिवळया व आँनलाईन सन 2017 यादीत जे नाव समाविष्ट केलेले आहेत त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

46 ग्रामस्थांच्या सह्या
निवेदनावर बंधारा गावाचे रमिला वसावे,नरपत वळवी,कृष्णा वसावे,भामट्या गावीत,गोपाळ वसावे,दिनेश वसावे,राकेश वसावे,सुनिल वसावे,अशोक वसावे,अनिल वसावे,अनिल अरविंद वसावे,सुदाम वसावे,समिल वसावे,अशोक वसावे,संभाजी वसावे,संदिप वसावे,जितेंद्र गावीत,लालसिंग वसावे,जगन्नाथ वसावे,,वेच्या गावीत,दिनेश वसावे,रविंद्र वसावे,सुरेश गावीत,वामन गावीत अमृत वळवी,अर्जुन वसावे असे 46 ग्रामस्थांचा नावानिशी सह्या आहेत.