हडपसर – येथील सुवर्ण मित्र मंडळाचे यंदाचे 34 वे वर्ष आहे. मंडळाच्या वतीने देखावे सादर करण्याची परंपरा यावर्षीही कायम आहे. यावर्षी 60 फूट लांब व 40 फूट उंच अशा बाहुबलीचा देखावा सादर केला आहे. देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘थ्रीडी लाइट इफेक्ट’ चलचित्र हत्ती व त्यावर बाहुबलीने मारलेली उडी हे यातील वैशिष्ट आहे. या इफेक्टमध्ये पेटलेला महाल पाहताना नागरिकांना चित्रपट पाहत असल्याचा आभास होईल. सिनेआर्टिस्ट लक्ष्मण पेंटर व प्रकाश व्यवस्थापक यशवंत भुवड यांनी याचे सादरीकरण केले आहे. हा देखावा गणेशोत्सव काळातील पहिल्याच दिवशी नागरिकांना पाहण्यासाठी खुला असेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कुमार विधाते यांनी दिली.
एक महिन्यापासून या देखाव्याचे कामकाज सुरू झाले आहे. सुरेश गुजर, अमर हडदरे, शफी सय्यद, भिवा शिंदे, गणेश साळुंके, सोमनाथ टेमगिरे, अप्पा बोटे, सचिन जगताप, गोपीनाथ पवार हे मंडळाचे पदाधिकारी देखाव्यासाठी परिश्रम घेत आहेत.