घाटकोपर । सुविचार म्हणजे मनाला, बुद्धीला आकार देणारे पुस्तक. सुविचारातून माणसाची जडण घडण होत असते. एक विचार माणसाला त्याच आयुष्य बदलायला लावतो. घाटकोपर पश्चिम अल्ताफ नगर, गणेश चौक येथे राहणारे 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महादेव हरी कंक 2002 पासून ते आजतागायत 17 वर्ष राहत असणार्या चाळीत फलक लावून त्यावर रोज एक नवा सुविचार लिहून नागरिकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहे. महादेव कंक यांना वाचनाची आणि लिखाणाची लहानपणापासून सवय. वाचणातून मिळणारे प्रत्येक विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घराभवती एक मोठे फलक बनवून कंक रोज सकाळी उठून त्यावर सुविचार लिहितात. या सुविचारामुळे प्रबोधन घडवत आहे.
गेली 17 वर्ष या फलकावर मी सुविचार लिहीत आहे. लोकांची नजर या फलकावर पडावी आणि विचारातून त्यांचा दिवस चांगला जावा हा माझा नेहमीचा प्रयत्न असतो. काही जण मला वेड्यात काढत गेली तरी मात्र मी माझी सवय बदलू दिली नाही.17 वर्षांचा अनुभव इतकाच काही लोक मला माझ्या सुविचाराबद्दल गोड कौतुक करतात. लोकांचं कौतुक हाच माझ्यासाठी एक पुरस्कार आहे.
– महादेव कंक
माझे वाचन खूप कमी आहे. महादेव काका अगदी थोडक्या शब्दात सुविचार लिहितात. त्यामुळे त्यांचे सुविचार वाचून मला आता वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
-आरती पवार