शहादा । शहरासह ग्रामिण भागात प्रवाश्याची सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. पोलिस प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रवाश्याची सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचे दिसून येत आहे.लोखंडी सळ्या,आणि अँगल ची वाहतूक, करतांना कोणतीही खबरदारी घेतल्या जात नाही.त्यामुळे सर्वसामान्य चा नागरिकाचा सुरक्षेतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
ही खबरदारी आवश्रक
लोखंडी सळ्याची वाहतुक करतांना नियमानुसार या सळ्याच्या रस्त्याकडिल टोकाला लाल कापड बांधणे आवश्यक आहे.मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता लोखंडी सळ्या,अँगल,सिमेंट चे पाईप,खांब आदी वस्तूची ,सर्रास वाहतुक केली जात आहे.याकडे पोलीस प्रशासनाबरोबर ,वाहतुक विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. शहादा खेतीया या मुख्य रस्त्यावर धोकादायक वस्तू ची वाहतूक होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेतेचा प्रश्न उपस्तीत होत आहे.धोकादायक वस्तूची वाहतुकीमूळे,अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहादा-खेतीया मार्गावर वाहनांवर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नसल्यानेच धोकादायक वस्तूची वाहतूक होत असल्याचा नागरिकाचा आरोप आहे.लोखंडी सळ्या,अँगल,पत्रे ,वाळू आदी वस्तूची ,वाहतूक करताना कोणतीही खबरदारी घेतली जात नाही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने धोकादायक वस्तूची वाहतुक करणार्या वाहन चालकांचे चांगलेच मनोबल वाढत असल्याचे दिसंत आहे.
अशी होते वाहतूक
शहादा शहरातील मुख्य बाजारातून काही मोठ्या प्रतिष्ठानाकडून लोखंडी सळ्या,टिनपत्रे ,अँगल, तसेच सिमेंट चे खांब विकत घेतले जातात .विकत घेतलेल्या धोकादायक वस्तू मिळेल त्या वाहनात भरल्या जातात.त्यानंतर मुख्य रस्त्यावरून धोकादायक वस्तूची वाहतूक सुरू होतो.वास्तविकरित्या लोखंडी सळ्या,अँगल,पाईप,तसेच कुठलीही धारदार वस्तू एका ठिकान्याहून दुसर्या ठिकाणी नेताना अनेक खबरदार्या घेणे आवश्यक आहेत.यामध्ये तीक्ष्ण वस्तूच्या टोकावर धोकादायक वाहतुकीच्या इशारा देण्यासाठी देण्यासाठी लाल कापड लावणे बंधनकारक आहे.त्याचप्रमाणे डोळ्यात उडणार्या वस्तूची झाकून वस्तूची वाहतूक करण्याचा नियम धाब्यावर बसवला जात आहे.