सुविधा एक्स्प्रेसमध्ये चोरी ; 46 हजारांचा ऐवज लंपास

0

भुसावळ- अप 82355 पटना-मुंबई सुविधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या महिलेची बॅग लंपास झाल्याची घटना गुरूवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून हा गुन्हा कटनी येथे वर्ग करण्यात आला. फिर्यादी ज्योतीसिंग अरुणसिंग (24, रा.आकृती ट्रेड सेंटर, एमआयडी मराळे, अंधेरी, मुंबई) या सुविधा एक्स्प्रेसच्या कोच एस- 5, बर्थ क्रमांक 68-69 वरून प्रवास करीत असताना कटनी स्थानकावर गाडी आल्याने चोरट्यांनी त्यांची बॅग लंपास केली. बॅगेत 32 हजारांचा अ‍ॅपल आयफोन, दोन ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स, एक हजार 700 रुपयांची रोकड मिळून 46 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल होता.