सुशांतमुळे शूटिंग थांबली

0

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत वादात सापडला आहे. सध्या सुशांत ‘किज्जी और मनय’या चित्रपटाची शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान सुशांतने त्याच्या को-स्टार संजना सांघीशी अतिजवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने तिने सेटवर येणेच बंद केले आहे.

सुशांतने तिच्याशी जरा एक्स्ट्रा फ्रेंडली वागण्यास सुरुवात केली. हे वागणे संजनाला फार रुचलेले दिसत नाही. त्यामुळे पुढील शूटींगसाठी संजना सेटवर आलीच नाही.

‘किज्जी और मनय’ हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘फाल्ट इन स्टार्स’ या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मात्र आता थांबलेले हे शूटींग पुन्हा कधी सुरु होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.