सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: सीबीआयची दुसरी टीम मुंबईत दाखल

0

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे दिला आहे. चौकशीसाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. पहिले पथक काल मुंबईत दाखल झाले होते, त्यानंतर आज २१ ऑगस्ट रोजी दुसरे पथक मुंबईत दाखल झाले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात पथक दाखल झालेले असून चौकशीला सुरुवात झाली आहे. सीबीआयकडून सुशांतच्या कुक (आचारी)ची चौकशी सुरु आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे दिसून येते. महाराष्ट्र सरकार चौकशी सीबीआयकडे न देण्यावर ठाम होती, मात्र हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्याने सुप्रीम कोर्टाने तपास सिबिंयकडे दिला. सुशांतसिंग प्रकरणावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार सरकार असे चित्र निर्माण झाले होते.