सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु

0

मुंबई: बॉलीवूड अभिनेते सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी शंका उपस्थित करण्यात आली असून सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कथित प्रियसी रिया चक्रवर्तीकडे बोट दाखविण्यात येत आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. दरम्यान सीबीआय चौकशीपूर्वी रिया चक्रवर्ती यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. आज शुक्रवारी ७ रोजी मनीलॉड्रींग प्रकरणी ईडी रिया चक्रवर्ती हिला चौकशीसाठी बोलविले आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु झाली आहे. सायंकाळपर्यंत त्याची चौकशी सुरु राहणार आहे. जवळपास ६-७ तास ही चौकशी चालू शकते.

मुंबईत रियाने घेतलेले घर आणि काही कंपनीच्या प्रॉपर्टीची चौकशी ईडी करणार आहे. कमी उत्पन्न असतांना रियाने मुंबईत घर घेतले आहे, त्यामुळे ईडी चौकशी करणार आहे. १५ कोटींचा व्यवहार रियाने सुशांतसिंह राजपूतच्या खात्यातून केल्याचे बोलले जात आहे. त्याचीही चौकशी होणार आहे.

गोरेगावमध्ये आणि लोणावल येथे रियाने फ्लॅट घेतले आहे. मात्र त्याचा वार्षिक उत्पन्न १४ लाखांचे असताना त्याने हे महागडे घर घेतले कसे? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्याचीही चौकशी होणार आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला राजकीय वळण लागले आहे. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणी तपास करीत होती. मात्र हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे अशी मागणी झाली. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिले.