मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करीत आहे. सीबीआय चौकशीचा आजचा (शुक्रवारी) आठवा दिवस आहे. सीबीआयने सुशांतसिंहशी संबंधित व्यक्तींची चौकशी केली आहे. दरम्यान आज २८ रोजी सीबीआयने सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावले असून चौकशीला बोलविले आहे. रिया सीबीआय चौकशीसाठी हजर झाली आहे. सांताक्रूझमधील अतिथीगृहात रिया पोहोचली असून चौकशी सुरु झाली आहे.
Mumbai: #RheaChakraborty arrives at DRDO guest house, where CBI team investigating #SushantSinghRajputDeathCase, is staying pic.twitter.com/yioaQdWj5b
— ANI (@ANI) August 28, 2020
गेल्या आठवड्याभरापासून सीबीआयकडून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरजची चौकशी करण्यात आली आहे. गेले सहा दिवस दररोज त्यांची चौकशी सुरू आहे. यानंतर आता आठवड्याभरानंतर रियाला सीबीआयने समन्स बजावले. रियासोबत तिचा भाऊ शोविकदेखील गाडीत आहे.
मलाही आत्महत्या करावीशी वाटते
‘गेल्या काही महिन्यात माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं माझ्यावर गंभीर आरोप होत आहेत. मला फाशी देण्याची मागणी होत आहे. मी तर म्हणते, एक बंदूक घेऊन या. माझं कुटुंब रांगेत उभं राहील. गोळ्या घालून संपवा आम्हाला. अन्यथा आम्ही आत्महत्या करतो. मग याची जबाबदारी कोणाची? माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत असे रियाने एका मुलाखतीत म्हटले आहे.