सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: संजय लीला भन्साली पोलीस ठाण्यात

0

मुंबई: बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांनी मागील महिन्यात आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान त्यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी होत आहे. बांद्रा पोलीस ठाण्यात सुशांतसिंहच्या आत्महत्येचा तपास सुरु आहे. दरम्यान आज बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साली बांद्रा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. ते आज त्यांचे म्हणणे मांडणार आहे. या अगोदर काही कलाकारांचे म्हणणे नोंदविले गेले आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला बॉलीवूडमधीलच दिग्गज कलाकार, निर्माते जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. यावरूनच चौकशी आहे.