‘सुशांत आत्महत्या करणार नाही’; मृत्यूची चौकशी व्हावी: नातेवाईकांची मागणी

0

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आज बांद्रा येथे राहत्या घरात आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगतात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सुशांतसिंह राजपूत यांच्या नातेवाईकांनी सुशांतसिंह आत्महत्या करणार नाही यावर आमचा विश्वास असून त्याच्यासोबत घातपात झाल्याचे शंका व्यक्त करत या मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. मागील आठवड्यात सुशांतसिंह राजपूत यांची मॅनेजर असलेल्या तरुणीने देखील आत्महत्या केली आहे. बिहारमधील पाटणा येथे सुशांतसिंह राजपूतचा परिवार वास्तव्यास असू असून करियरच्या निमित्ताने सुशांत एकटा मुंबईला राहत होता. काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह राजपूतच्या आईचे निधन झाले होते. आईच्या निधनानंतर सुशांतसिंह राजपूत याने इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट केली होती ती त्याची शेवटची पोस्ट आहे.