सुशांत सिंग कॅन्सरग्रस्त चाहत्याच्या मदतीसाठी पुढे सरसावला

0

मुंबई : अभिनयासोबतच सुशांत सिंग राजपूत समाजकार्य करण्यामध्येही अग्रेसर असल्याचं अनेकांनी पाहिलं आहे. काही महिन्यांपूर्वी केरळमध्ये पुराने थैमान घातलं होतं. त्यावेळी सुशांतने येथील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर आता एका कर्करोग ग्रस्त चिमुरड्यासाठीदेखील सुशांत पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे.

आत ब्लड कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका चिमुरड्याने सुशांतची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. Ketto India या क्राऊड फंडिंग संस्थेने या मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याची इच्छा स्पष्ट केली आहे. या मुलाचं नाव ऐरन असं असून या संस्थेने या पोस्टमध्ये सुशांतला टॅग केलं आहे.
सुशांतला ज्यावेळी या मुलाच्या आजारपणाची आणि त्याची इच्छा समजली त्यावेळी तात्काळ त्याने उत्तर देऊन मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. ‘