सुशांत सिंग राजपूत आता निर्मितीकडेही वळतोय

0

मुंबई: छोट्या पदाचा मानव पासून मोठ्या पडायचा धोनी यांसारख्या दमदार भूमिका साकारणारा सुशांत सिंग राजपूत आता निर्मितीकडे वळण्याच्या तयारीत आहे. एका सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक तो प्रेक्षकांच्या भेटीला आणत असून त्याचे हक्क मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे.

२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बँगलोर डेज’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक सुशांत आणणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसोबतच तो मुख्य भूमिका साकारणार असल्याचीही माहिती आहे. ‘बँगलोर डेज’चे निर्माते विवेक रंगाचारी यांच्या संपर्कात सुशांत असून चित्रपटाचे हक्क मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे.