सुशांत सिंह राजपूतच्या अखेरच्या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज !

0

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या अखेरच्या चित्रपटाचा ट्रेलर आज 6 जुलैला रिलीज झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे हा चित्रपट थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर सुशांतच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचाही हा पहिलाच चित्रपट आहे. 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणार आहे. ही कहाणी कॅन्सरग्रस्त जोडप्याची आहे. या सिनेमात सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

‘दिल बेचारा’ चित्रपट हॉलिवूडच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या सिनेमाचा रिमेक आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे.