सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; मुंबई पोलिसांनी चौकशी थांबिवली

0

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण लागत आहे. मुंबई पोलीस सुशांत सिंह आत्महत्येची चौकशी करत होती. मात्र आता मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी थांबविणार आहे. बिहार पोलिसांनी चौकशीत हस्तक्षेप केल्याने मुंबई पोलिसांनी चौकशी थांबिवली आहे. बिहार पोलिसांच्या निष्कर्षानंतरच मुंबई पोलीस चौकशीबाबत पुढील निर्णय घेणार आहे. दरम्यान आजच सकाळी सुशांत सिंह राजपूतच्या चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी ही मागणी फेटाळून लावत याचिका फेटाळली.

मुंबई पोलिसांनी चौकशी थांबविल्याने आता दिग्दर्शक करण जोहरची चौकशी देखील पुढे ढकलली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात कॅवेट दाखल करण्यात आले आहे. सुशांतची मैत्रीण रियाने देखील सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.