सुशासन दिन साजरा

0

चिंचवड : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वीकृत नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे यांच्या वतीने चिंचवड येथे सुशासन दिन व विविध कार्यक्रमांचे चिंचवड गुरुकुलम येथे आयोजन केले होते. गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना, तसेच स्वर्गीय तात्या बापट समिती संचलित पुर्वांचल सिमा विकास प्रतिष्ठानच्या छात्रावासमधील विद्यार्थ्यांना ब्लँकेट्स व खाऊ वाटप केले. यावेळी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवडूण आल्याबद्दल संतोष ढोरे, तर महाराष्ट्र वीज महावितरण समिती सदस्यपदी मधुकर बच्चे यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आले. शेडगे यांनी प्रास्ताविक केले, नंदू भोगले यांनी सुत्रसंचालन तर तुकाराम चौधरी यांनी आभार मानले. अजित कुलथे, धनंजय शाळिग्राम, राघू चिंचवडे, राजन पाटील, अतुल पडवळ, स्वप्निल शेडगे, पराग जोशी, स्वप्निल भोईर, गणेश बच्चे आदींनी संयोजनासाठी परिश्रम घेतले.