सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवरुन काँग्रेस गाढवपणा करत आहे: प्रकाश आंबेडकर

0

सोलापूर:काल बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. याभेटीवरून राजकारण रंगले आहे. तर्क-वितर्क लढविले जात आहे. दरम्यान याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आमची भेट ही अचानक झालेली असून यात कोणतेही राजकारण नाही. मात्र काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे, सुशीलकुमार शिदे यांच्या भेटीवरुन काँग्रेस गाढवपणा करणार हे वाटलेच होते अशी टीका केली आहे.

अचानक झालेल्या भेटीचे राजकारण करणे काँग्रेसवाल्यांना चांगलेच जमते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ‘निवडणूक हे लोक कोणाला निवडून देतात त्यावर अवलंबून असते. पण असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक धडा शिकवतील’, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.