मुंबई । डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानतर्फे 20 ऑगस्ट रोजी 20 व्या सुशीला वझे आंतरशालेय सांघिक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धसाठी चौघां बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या शालेय संघान प्रवेश देण्यात येईल. सहा गटांमध्ये होणार्या या स्पर्धेतील पहिली ते दुसरी, इयत्ता तिसरी आणि इयत्ता चौथीपर्यंतचे सामने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खेळवण्यात येतील. तर इयत्ता पाचवीपासून पुढील गटांचे सामने दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत खेळवण्यात येतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी डॉ. प्रकाश वझे यांच्याशी 9920148806 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.