सुशोभिकरण कामांचे महापौरांच्याहस्ते भूमिपूजन

0

जळगाव । शहरातील काव्यरत्नावली चौक ते डी-मार्ट, इच्छादेवी मंदीर चौक ते डी. मार्ट व शिरसोली रोड ते डी-मार्ट अशा तीनही मुख्य रस्त्यालगत तांबापुराजवळ महानगरपालिका मालकीची खुली बखळ जागेचे जैन उद्योग समुहाद्वारे विकसीत करून सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

ही जागा बखळ स्वरूपाची असून येथे अतिक्रमण वाढत होते. या जागेचा समाजपयोगी सदुपयोग व्हावा या उद्देशाने ही जागा विकसित करण्यात येत आहे. याकामाचे भुमिपुजन महापौर नितीन लढ्ढा यांच्याहस्ते बुधवार 2 ऑगस्ट रोजी करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक सदाशिव ढेकळे, सादीक खाटीक, जैन उद्योग समुहाचे दिक्षीत, अभियंता विजय मराठे तसेच परिसारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.