सुश्मिता सेन लग्नाच्या तयारीत ?

0

मुंबई : हल्ली सुश्मिता सेन नेहमी हेडलाईनमध्ये असते याचे कारण म्हणजे सगळ्याठिकाणी तिचा बायॅफे्रन्ड रोहमन शॉल हातात हात घालून हजर असतो. साहजिकचं दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. दोन दत्तक मुलींची आई असलेली सुश्मिता नववर्षात रोहमनसोबत लग्न करणार असे मानले जात आहेत. अर्थात लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सुश म्हणतेय. पण एकीकडे ती लग्नाची शक्यता नाकारत असताना दुसरीकडे सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट लग्नाचे संकेत देत आहेत.

सुश्मिताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली. यात पोस्टमधील फोटोत सुश्मिताच्या होता तिच्या आईच्या लग्नातील बांगड्या आहेत.‘माझ्या आईच्या लग्नातील बांगड्या,’ असे तिने या फोटोवर लिहिले आहे. सोबत हार्ट इमोजी आहे. सुश्मिताची ही पोस्ट बरेच काही सांगणारी आहे. सुश लवकरच लग्न करणार, हे सांगण्यासाठी ही पोस्ट पुरेशी आहे.