सुषमा स्वराजांचे अंत्यदर्शन घेताना मोदींना अश्रू अनावर !

0

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री ‘एम्स’ रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुषमा स्वराज यांचे पार्थिव जंतर मंतर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांचे अंतिम दर्शन घेतले आहे. मात्र यावेळी मोदी भावूक झाले होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराजला धीर देण्याचाही प्रयत्न केला.

सुषमा स्वराज यांच्या जाण्याने नरेंद्र मोदींना मोठा धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले असता त्यांच्या चेहऱ्यावरुन हे स्पष्ट जाणवत होते. त्यांनी ट्विट करत हे आपले वैयक्तिक नुकसान असल्याचेही सांगितले होते.

नरेंद्र मोदी यांनी २०१४-१९ दरम्यानच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांच्यावर परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी जबाबदारी सोपवली होती. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रीपद भूषवताना चांगलीच लोकप्रियता मिळली होती. एका ट्विटर त्यांनी जगाच्या कोपत्याही कोपऱ्यात अडकलेल्या भारतीयाची मदत केली होती.