सुष्मिताने दिली रॉमन श्वालनं सोबतच्या रिलेशनची कबुली

0

मुंबई : प्रेमाचं आणि सौंदर्याचं मुर्तीमंत उदाहरण ताजमहलला मानला जातं. ताज महाल प्रेमाचं प्रतीक म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. या ताजमहालला सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रॉमन श्वालनं भेट दिली आहे. सुष्मितानं रॉमन आणि काही मित्रपरिवारासोबत ताजसमोर बसून फोटो काढले तिनं ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

विशेष म्हणजे याच पोस्टमधून तिनं अप्रत्यक्षरित्या रॉमनला डेट करत असल्याची कबुलीही दिली आहे. सुष्मिता ४२ वर्षांची आहे तर रॉमन २७ वर्षांचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी एका फॅशन इव्हेंटमध्ये रॉमन आणि सुष्मिता दोघंही एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी आहे, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. मात्र रॉमन आपलं आयुष्यातलं प्रेम आहे असं सांगत सुष्मितानं एकप्रकारे रॉमनसोबतच्या आपल्या नात्याला दुजोरा दिला आहे.