मुंबई : सुष्मिता सेन पुन्हा एकदा लाइमलाइट मध्ये आली आहे. तिच्या फॅन्सना नेहमीच तिच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेयचे असते. आता सुष्मिता पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा सुरु आहे. तो व्यक्ती एक मॉडेल असून तिच्याहून १५ वर्षांनी लहान असल्याची माहिती आहे. सुष्मिता ही ४२ वर्षांची सिंगल मदर असून तिने रीनो आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी एका फॅशन शोमध्ये दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. त्यावेळी दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आले. या दोघांचे नुकताच डेंटिग सुरु झाल्यामुळे इतक्यात त्यांनी नात्याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही.