सुसंस्कृती फाऊंडेशनतर्फे ‘मेहंदी रंग लायो’ दांडीया रास

0

शहरात प्रथमच उत्सवाचे आयोजन; दरवर्षी नवरात्रोत्सवात होणार दांडीया रास .

शिरपूर । शहरात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. तिसर्‍या माळेला अग्रेसन भवनात ‘मेहंदी रंग लायो’ हा उत्सव तरुणांसह तरुणींनी, महिलांनी तसेच लहानग्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. शरपूर शहरात प्रथमच सुसंस्कृती फाऊंडेशनतर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष धनंजय ओसवाल, अक्षय शहा, आतिष ओसवाल यांच्या वतीने उत्सव साजरा होत आहे.

३ ते १५ वयोगटातील मुलांचा समावेश
यावेळी पोलीस निरीक्षक संजय सानफ, उपनिरीक्षक अतुल तांबे, राहुल दांडे, पायल दांडे, सुवालाल ललवाणी, संतोष राखेचा, यश शहा, जतीन शहा, डॉ.अमोल शहा, राजेंद्र ओसवाल, उपेंद्र ओसवाल, अँड.अमित शहा, अतुल जैन, गणेश जैन आदी उपस्थित होते. ३ ते १५ वयोगटातील मुला मुलींने राजस्थानी व चुंदरी साड्या परिधान केले होते. परिक्षक म्हणून दांडे यांनी कामगिरी पाहिली. दिपकुमार शहा, दिपाली शहा यांच्या संघाला, खूशी चोरडिया, स्नेहल बाफना आदींना गौरविण्यात आले. लकीड्राँचे देखील बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरवर्षी सुसंस्कृती फाऊंडेशनचा ‘मेहंदी रंग लायो’ हा दांडीया रास कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेही फाऊंडेशनच्या संयोजकांनी सांगितले. सूत्रसंचालन अक्षय शहा यांनी केले आणि उपस्थित प्रेक्षकांचे आभार आतिष ओसवाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आतिष ओसवाल, अक्षय शहा, रोशन ओसवाल, गणेश चोरडिया, भुपेश आग्रवाल, चंदू गिरासे, ललित कोचर, दर्श चोरडिया, नाना गोसावी, योगेश आहिरे, युवराजसिंग परदेशी आदींनी परीश्रम घेतले.