सुसंस्कृत नागरीक राजकारणात आल्यास भ्रष्टाचाराला आळा

0

नगराध्यक्ष रमण भोळे ; भुसावळच्या देविदास भोळे महाविद्यालयात जिल्हा युवक सांसद कार्यशाळा

भुसावळ- देशातील सुशिक्षीत व सुसंस्कृत नागरीक राजकीय प्रक्रियेत सहभागी झालेत तर अनेक गैरव्यवहारांना आळा बसून सक्षम नेतृत्व निर्माण होईल, असा आशावाद शहराचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी येथे व्यक्त केला. दे.ना.भोळे महाविद्यालयात सोमवारी जिल्हा युवक सांसद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भोळे बोलत होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या आणि अश्या कार्यक्रमांमधे सहभागी होऊन वक्तृत्व शैली, खेळ, सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात सकारात्मक राहून चिंतन आणि विचार मंथन करावे. क्षेत्र कोणतेही असावे पण त्यात नेतृत्व करावे, परीसरातील लोकांना कार्याला वाहून घेण्यासाठी प्रवृत्त करणे यासाठी नेता आवश्यक असतो म्हणून तुम्ही सर्वांनी नेता म्हणून पुढे यावे, असे आवाहनही भोळे यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्हा युवक सांसद कार्यशाळेचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्याहस्ते झाले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, पांडुरंग दगडू सराफ, प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते.

युवा संसद हा कार्यक्रम उल्लेखनीय -मुख्याधिकारी
मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावरचा हा अत्यंत नाविण्यपूर्ण कार्यक्रम असून आज जगात सर्वात युवा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, सुदृढ करण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी युवा संसद हा कार्यक्रम अत्यंत उल्लेखनीय आहे, असे सांगून विविध नामवंत कवींच्या ओळीं च्या माध्यमातून दोरकुळकर यांनी आपले विचार व्यक्त केले.पांडुरंग सराफ म्हणाले की, देशातील युवा नेतृत्व सक्षम होण्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे पथदर्शी प्रकल्प होऊ शकतो.

यांनी केले परीक्षण
या कार्यक्रमाचे परीक्षण राजकीय दृष्टीकोनातून प्रा.डॉ.शोभा चौधरी, शासकीय अधिकार्‍याच्या दृष्टीकोनातून भुसावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, पत्रकाराच्या भूमिकेतून डॉ.जगदीश पाटील, सामाजिक कार्यकर्त्याच्या दृष्टीकोनातून चंद्रकांत चौधरी, शिक्षण तज्ज्ञांच्या भूमिकेतून जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रभाकर श्रावण चौधरी यांनी केले. या युवा संसद साठी जिल्ह्यातील 52 युवक युवती सहभागी झाले आहेत. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आर.पी.फालक तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी केले.

यांनी घेतले परीश्रम
या कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.राजेंद्र भोळे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.माधुरी पाटील, प्रा.अंजली पाटील, प्रा.जयश्री सरोदे, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.तबरेज खान, प्रा.रोहित तुरकेले, प्रा.गिरीश सरोदे प्रा.दीपक जैस्वाल, सर्व प्राध्यापक वृंद व सुधाकर चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, विजय पाटील, राजेश पाटील, दीपक महाजन, प्रमोद नारखेडे, शिक्षकेतर कर्मचारीवृंद, एनएसएस विद्यार्थी व हर्षवर्धन बाविस्कर यांनी परीश्रम घेतल्याचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक व नोडल अधिकारी प्रा.डॉ.डी.एस.राणे व प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.