सुसंस्कृत बनण्यासाठी संस्कृतीशी जोडुन राहण्याची गरज

0

शेंदुर्णी : शिक्षणाने माणुस सुशिक्षीत बनतो पण सुसंस्कृत बनण्यासाठी संस्कृतीशी जोडुन राहण्याची गरज प्राचार्य साहेबराव खंदारे यांनी व्यक्त केली. ते कै.आचार्य गजाननराव गरुड व्याख्यानमालेत बोलत होते. प्राचार्य साहेबराव खंदारे(परभणी) यांनी संस्कृती व आधुनिक समाज या विषयावर व्याख्यान देत होते. याप्रसंगी व्यासपिठावर व्याख्यानमाला आयोजन समितीचे सागरमल जैन,सुधाकर बारी ,शांताराम गुजर, विठ्ठल फासे, अनिल झंवर , रामचंद्र निकम ,अविनाश निकम , प्राचार्य संजय भोळे, मुख्याध्यापक मांडवळे,ए.टी.चौधरी, उपस्थीत होते

सोशल मिडीयामुळे माणूसकी संपली
प्राचार्य खंदारे यांनी संस्कृतीचा महिलांच्या आरोग्यांशी असलेला सबंध विषद करतांना पुर्वीच्या काळी सकाळी महिला जात्यावर दळतांना ओव्या म्हणायच्या त्यामुळे मन प्रसन्न शारीरीक व्यायामही व्हायचा व महिलांचे आरोग्य सदृढ रहायचे असे पुढे सांगितले. आधुनुकीकरणात इलेक्ट्रीक चक्क्या आल्या व शारीरीक श्रमसंपल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवु लागल्या आहेत. तसेच सद्या सोशल मिडीयाचा वाजागाजा करतांना फेसबुक व व्हाट्सअपच्या जमान्यात जग जवळ आले पण माणुसकी संपुन माणसे दुरावली गेल्यांची खंत यावेळी व्यक्त केली. यासोबतच लग्न समारंभ व इतर सोहळ्याचे सोपस्कार सुद्धा सोशल मिडीयाव्दारे पुर्ण केले जातात त्यामुळे माणुसकी व जिव्हाळा आटला असे सांगतिले. आजच्या आधुनिकतेच्या युगात फक्त विकास होत आहे पण शाश्वत विकास होत नसल्यामुळे संस्कृतीचा र्‍हास होत आहे त्यामुळे मानवास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.म्हणुन संस्कृतीचे जतन करुन विकास साधने जरुरी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. य