सुसरी नदीवरील पुलाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन

0

शहादा । तालुक्यातील खेडदिगर व मुबारकपुर या दोन्ही गावाना जोडणार्‍या सुसरी नदीवरील पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. मुबारकपुर गावाजवळ सुसरी नदीजवळ सद्यस्थितीत तुटलेली फरशी आहे.

2006 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलावरील फरशी बर्‍राप्रमाणात वाहुन गेली होते त्यामुळे नदीचा प्रवाह देखील पूर्णपणे बदलला होता. पुलाअभावी परिसरातील गावांच्या परस्परांशी असलेला संपर्क तुटतो. त्यात मुबारकपुर गणोर खेतीया आदी गावांचा समावेश होतो. परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी पुल बांधण्यासाठी पाठपुरावा केला. 2009 -10 मध्ये आदिवासी विकास विभागाचा अर्थसंकल्पात पुल मंजुर करण्यात आला होता. मात्र निधीअभावी पुलाचे काम रखडले होते. बर्‍याच प्रतिक्षेनंतर पुलाचे भूमिपुजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील आदी उपस्थित होते.