मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान स्टार किड्समध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. सिनेमात येण्याआधीच तिचे फॉलोअर्स वाढताना दिसत आहे. सध्या ती लंडनमध्ये आपल्या फ्रेंड्स सोबत शिक्षण पूर्ण करत आहे.
नुकतेच तिने वोग मॅग्झिनसाठी फोटोशूट केलं होतं आणि लोकांनी त्यास पसंती देखील दिली होती. तिचा एक फोटोही सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोयं. यामध्ये ती बोल्ड आणि बिंदास्त लूक मध्ये दिसत आहे.
शाहरूख खानचा मुलगा आणि सुहानाचा भाऊ आर्यन यावेळी लॉस एंजलिसमध्ये फिल्ममेकिंगच शिक्षण घेत आहे. सुहाना आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लॉस एंजिलसमध्ये आपल्या भावासोबत अभिनयाचा शॉर्ट टर्म कोर्स करणार आहे.