यंदा 21 ऑगस्ट रोजी होत असलेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा नजारा अमेरिकेत 99 वर्षांनतर पाहता येणार असल्याने या दिवशी अमेरिकेला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याचे चॅलेंजर ग्रे अॅन्ड किसमन या कंपनीचे म्हणणे आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार सोमवारी होणारे हे ग्रहण पाहण्यासाठी प्रत्येक कर्मचारी सरासरी 20 मिनिटे घालवेल. त्यामुळे अमेरिकेचे त्या काळातले उत्पादन थांबणार आहे व त्याचा थेट फटका बसणार असून 70 कोटी डॉलर्स म्हणजे 4500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.
खग्रास ग्रहणाचा कालावधी दीड मिनिटांचा आहे. त्यावेळी 8 कोटी 70 लाख कामगार अचानक काम थांबवणार त्यामुळे काही मिनिटांचा आऊटपूट थांबणार. त्यामुळे हे नुकसान होणार आहे. हा आकडा कामगार सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीप्रमाणे काढला गेला आहे. त्यात 16 वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कामगारांना दिल्या जाणार्या प्रती तास वेतनावर आधारित आहे.