सूर्यमालिकेच्या बाहेर नवा चंद्र

0

न्यूयॉर्क : रोमिओ त्याची प्रेमिका ज्युलिएटसाठी म्हणतो माझा सूर्य पूर्वेच्याही पलिकडे उगवतो. आता खगोलशास्त्रज्ञांनी आपल्या सूर्यमालिकेच्या बाहेर पहिल्यांदाच एक चंद्र पाहिला आहे. मालिकेबाहेरील ग्रह पाहणे एकवेळ सोपे आहे पण त्यांच्याशी निगडित चंद्र पाहणे खूपच कठिण असते असे शास्त्रज्ञ सांगतात.

सूर्यमालिकेबाहेरील ग्रहांच्या लहान आकारामुळे आणि त्यांचे पृथ्वीपासून अंतर जास्त असल्याने शास्त्रज्ञांवर त्यांचा अधिक अभ्यास करण्यावर मर्यादा आहेत. प्रकल्प प्रमुख कोलंबिया विद्यापीठाचे डॉ. डेव्हीड किपिंग यांच्या म्हणण्यानुसार सूर्यमालिकेबाहेरील चंद्राबाबत मात्र त्यांना ठोस पुरावे मिळालेले आहेत.

एका संशोधन लेखात किपिंग यांनी केप्लर दुर्बिणीचा वापर करून २८४ सूर्यमालिकांची एक यादी केल्याची माहिती दिली आहे. या मालिकांमधील ग्रह पृथ्वी आणि गुरूच्या आकाराचे आहेत. त्यांना उपग्रहही आहेत. सूर्यमालिकेबाहेरील चंद्राबाबत अजुनही संशोधन सुरूच आहे. सध्यातरी आम्ही असा चंद्र असल्याचे सूचित केलेय, असे किपिंग म्हणाले.