जळगाव। सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे मंडळाच्या 14व्या वर्धापनदिनानिमित्त दलूभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय तेरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन भास्कर मार्केट परिसरातील जैन संघटनेच्या सभागृहात रविवार 20 ऑगस्ट 2017 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. संमेलनाच्या कालावधीपर्यंत सभागृहास खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी, व्यासपीठास बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे परिसरास प्रा.राजा महाजन नगर, प्रवेशव्दारास चिमणराव ठाकरे प्रवेशव्दार अशी नावे दिली आहेत.
बालकवी ठोंबरे यांच्या स्मृती जागवणारा कार्यक्रम
2017-18 हे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची स्मृती शताब्दी वर्ष असल्याने या वर्षाचे संमेलन कविता या वाड्मय प्रकारास वाहिलेले आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ख्यातनाम लेखक, कवी 85व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके (अमरावती) हे भूषविणार असून सकाळी 10 वाजता नामवंत लेखक, कवी, ज्येष्ठ पत्रकार विश्वास वसेकर (पुणे) यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.आर.एस.माळी (माजी कुलगुरु उमवि), प्रा.डॉ.पी.पी.पाटील (कुलगुरु उमवि), डॉ.उल्हास पाटील (गोदावरी फाऊंडेशन), अशोक जैन (जैन इरिगेशन), प्रभा गणोरकर (अमरावती), सुभाषचंद्र वैष्णव (पुणे), दलुभाऊ जैन हे उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळा दलूभाऊ जैन व विश्वास वसेकर यांचा अभीष्टचिंतन सोहळा होईल. संमेलनात जागवू या स्मृती या सत्रात बालकवी यांच्या स्मृती जागवणारा कार्यक्रमात प्रा.डॉ.संगिता म्हसकर, जळगाव (बालकवींच्या कवितेतील काव्यात्मकता), सुजाता बोरकर, जळगाव (बालकवींची निसर्ग कविता), या जागवतील. या सत्राचे प्रा.बी.एन.चौधरी, धरणगाव अध्यक्षपद भूषवतील. यावेळी सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.