चाळीसगाव। यवतमाळ येथे राजकीय वैमनस्यांतुन आठ महिन्यापूर्वी वडीलांच्या खुन प्रकरणातील त्या खुनाची साक्षीदार असलेल्या सुष्टी दिवडे व दिवडे कुटुबीयाना स्थानिक गुंड त्रास देत आहेत. राजकीय दबाव आणुन गंभीर गुन्ह्यात त्यांना अडकविले आहे सृष्टी दिवडे सामाजिक कार्यकर्त्या असुन त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसतांना त्यांचावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ निकाली काढण्यात यावे अशी मागणी चाळीसगाव येथे रयत सेना, विर भगतसिंग परिषद, संभाजी सेनेच्या वतीने शुक्रवारी 18 रोजी मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महिला अत्याचार विरोधात लढा उभारणार्या तसेच शिवजयंती मिरवणुकीत तलवार फिरविल्याप्रकरणी सहा महिन्यानंतर दिवडे यांच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. खोटे गुन्हे मागे न घेतल्यास महाराष्ट्रात विविध संघटनेतर्फे तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक गणेश पवार, पंकज रणदिवे ,देवीदास साबळे, भूषण पाटील, अतिश कदम, योगेश निकम, मलिन मराठे, रमेश वाघ, संजय कापसे, मयूर चौधरी, अनिल कोल्हे, भारत चव्हाण, रोहित कुमावत, खुशाल बिडे, विनायक मराठे, सुनिल निबाळकर, धनंजय देशमुख, दिलीप पवार, विजय दुबे, प्रदीप मराठे, अविनाश काकडे, ज्ञानेश्वर पगारे, अनिल शिरसाठ, बापूराव पाटील आदींच्या सह्या आहेत..