सॅटर्डे क्लबतर्फे उद्योगबोध परिषदेचे आजपासून आयोजन

0

जळगाव : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे 13 व 14 जानेवारी रोजी उद्योगबोध-2017 या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती क्लबतर्फे कळविण्यात आली आहे. 13 जानेवारी रोजी ठाणे पश्‍चिम येथील टीपटॉप प्लाझा येते सॅटर्डे क्लबतर्फे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा होईल तसेच परिषदेत 1100 उद्योजक यात सहभागी होऊन व्यवसायाची देवाण-घेवाण करणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग समुहाचे प्रतिनिधी परिषदेला येणार असून, महिलांसाठी विशेष संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अंधेरी येथील पंचतारांकित हॉटेल ललित येथे 14 जानेवारी रोजी ही परिषद होणार आहे. याप्रसंगी सॅटडे क्लबचे ब्रँड अँबेसेडर ज्येष्ठ अभिनेते संदीप कुळकर्णी उपस्थित राहणार आहे.

यांचे मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन
या परिषदेत भांडवल, मार्केटिंग, लघु व मध्यम उद्योग, सागरी व्यवसाय संधी, उद्योजकांच्या यशोगाथा यावर पद्मश्री जी.डी. यादव, गिरीश जाखोटीया, काडसिध्देश्‍वर स्वामी, जगत शाह, भरत दाभोळकर, डॉ. गोंधळेकर, शंतनु भडमकर, कल्पेश अगरवाल, नितीन गोडसे, कल्पना सरोज, रेवती रॉय, मानसी बिडकर, अशोक दुग्गाडे, रवींद्र प्रभुदेसाई, डॉ. अजित मराठे, डॉ. सुरेश हावरे आदी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त दिग्गज मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व नोंदणीसाठी संपर्क माजी केंद्रीय सहसचिव छबीराज राणे 98200 43037, अध्यक्ष श्रीधर इनामदार 94239 75272, मानद सचिव विनीत जोशी 82751 70705ल कोषाध्यक्ष अभिजीत पाटील 97668 16393 यांच्याशी संपर्क साधावा किंवा संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव चॅप्टरच्यावतीने करण्यात आले आहे.