पुणे : महापालिका शाळांबरोबरच इतर शाळांमधील महिला स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन बसविण्याच्या प्रस्तावाला महिला व बालविकास समितीने मंजुरी दिली आहे. या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करावा अशी मागणी वानवडीच्या नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी घनकचरा विभागाच्या उपायुक्तांकडे केली आहे. नगरसेविका पुंडे यांनीच यासंदर्भात 3 जुलैला महिला व बालकल्याण समितीपुढे प्रस्ताव मांडला होता.
शहरातील महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न नेहमीच चर्चेत येत असतो. महापालिका शाळांबरोबरच इतर शाळांमधील विद्यार्थीनींच्या सोयीसाठी या शाळांमधील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या मशीन बसविण्यात याव्यात, असा प्रस्ताव पुंडे यांनी दिला होता. अर्चना पाटील यांनी त्यास अनुमोदन दिले होते. महिला व बालकल्याण समितीच्या 12 जुलैला झालेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.