मुंबई : पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला समर्थन देण्यासाठी बनविण्यात आलेला टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपट रिलिज व्हायला थोडा वेळ असताना अक्षय कुमारने आपल्या आणखी एक चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव पॅडमॅन असे आहे.
सॅनिटरी नॅपकिन क्षेत्रात क्रात्नी केलेल्या अरूणाचलम मुरुगनाथन यांच्या सत्यकथेवर आधारित ही फिल्म आहे. आर बाल्की दिग्दर्शित ही फिल्म १३ एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल फिल्मची निर्माती आहे. अक्षयकुमारसोबत राधिका आपटेने काम केले असून सोनम कपूरचीही महत्वाची भूमिका आहे. फिल्मच्या पोस्टरवर अक्षयकुमार नदीच्या घाटावर पायऱ्यांजवळ सायकल चालवित आहे असे दाखविले आहे. फिल्ममध्ये अमिताभ बच्चनची छोटीशी भूमिका आहे.