सॅनिटरी नॅपकीनवरील 12 टक्के जीएसटी रद्द करा

0

पुणे । ‘सॅनिटरी नॅपकीन चैन नाही, गरज आहे आमची, का त्यावर 12 टक्के जीएसटी, टॅक्स फ्री विंग्ज,’ अशा घोषणा देत सॅनिटरी नॅपकीनवरी 12 टक्के जीएसटी रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. येरवडा येथील जीएसटी कार्यालयासमोर आंदोलन करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सहआयुक्त यांना निवेदन देण्यात आले. सॅनिटरी नॅपकिनवर 12 टक्के जीएसटी आहे. महिलांच्या आरोग्याशी संबंधित अतिशय गरजेच्या या सॅनिटरी नॅपकिनवरील कर सातत्याने मागणी करूनही कमी केलेला नाही. ज्या केंद्राकडून खाकरावरील कर त्वरीत कमी केला जातो. तिथे महिलांच्या आरोग्याशी निगडीत महत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकिनला का दुर्लक्ष केले जाते? असा प्रश्‍न उपस्थित केला.