सॅनिटरी नॅपकीन वापरासाठी ऑनलाईन मोहिम

0

मुंबई : मासिक पाळी हा महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील अशी बाब आहे. याच मासिक पाळीचा पार्श्‍वभूमिवर अनेक कार्यकर्त्यांच्या आणि संघटनांच्या मागणीवरुन भारतात सॅनिटरी नॅपकीनवरील कर कमी करण्यासाठी एक प्रभावी अशी ऑनलाईन मोहीम चालवली जात आहे. याबाबत एक याचिका अरुण जेटली यांकडे दाखल करण्यात आली आहे.

आपला भारत देशात मासिक पाळीच्या काळात किती महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात? हा एक मोठा प्रश्‍न आहे. मात्र संशोधनातून अशी बाब समोर आली की, भारतात महिला मासिक पाळीच्या काळात खूप कमी प्रमाणात सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. या कारण म्हणजे अनेक बहिलांना नॅपकीन खरेदी करणे परवडणारे नाही. नॅपकीनची किंमत परवडणारी नसल्याने महिला त्यांचा वापर करणे टाळत. मात्र तेच जर या नॅपकीनवरील खरेदीचा कर कमी केला गेला किंवा समाप्त केला तर भविष्यात सॅनिटरी नॅपकीनचा वापर वाढेल.

केलेल्या संशोधनातून अशी माहिती समोर आली की, 355 मिलियन महिलांमधून अवघ्या 12 टक्के महिला या सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात, तर ग्रामीण भागात 75 टक्क्यांपैकी फक्त 2 टक्के महिला या नॅपकीनचा वापर करतात. नॅपकीनचा एवढा कमी वापर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे जर या मोहिमेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला तर ही या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरेल.

सॅनिटरीबाबत जनजागृती होणे गरजेचे
सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत समाजात जनजागृती होणे फार गरजेचे आहे. त्यातल्या त्यात शाळेत तसेच महाविद्यालयात याची जनजागृती झाली पाहिजे. तसेच जनजागृती करण्यात महिलांचा सहभाग जास्त असणे आवश्यक आहे, जो आता फक्त 21.9 टक्के एवढाच आहे.

पर्यावरणीय परिणाम
सॅनिटरी नॅपकीन हे प्लास्टीकपासून बनवलेले असल्याने त्याची विल्ह्ेवाट लावणे अडचणीचे जाते. त्यामुळे पर्यावरणीय सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेता असे नॅपकीन बनवण्याची गरज आहे ज्यांची विल्हेवाट लावता येईल.

सॅनिटरी नॅपकीन वरील कर कमी होणे गरजेचेच आहे. मात्र, मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकीन वापराबाबत आपल्या देशात, खेड्या-पाड्यात जनजागृती होणे फार आवश्यक आहे. जेणे करून लोकांना सॅनिटरी नॅपकीनबाबत माहीती मिळेल.
– सिद्धी कारखानिस,अभिनेत्री

काही खेड्यापाड्यात सॅनिटरी नॅपकीन हे वापरासाठी हानीकारक असतात असा गैरसमज आहे. तो सर्वांत आधी दूर होणे गरजेचे आहे. तो जर दूर झाला तक नक्कीच सॅनिटरी नॅपकीन वापराचे प्रमाण वाढेल. त्याचबरोबर जर त्यावरील कर कमी झाला तर त्याचे प्रमाण आणखी वाढतचं जाईल.
– रुचीरा जाधव,अभिनेत्री