लॉकडाऊनमध्ये हिंदूंना रेशन देण्यास पाकिस्तानचा नकार

0

इस्लामाबाद – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान कराचीमध्ये प्रशासनाने हिंदूंना रेशन देण्यास नकार दिला आहे. यामुळे पाकिस्तानचा अमानुष चेहरा समोर पुन्हा एकदा समोर आला आहे.

कराचीच्या रेहड़ी घोथमध्ये हजारो गरीब लोक धान्य आणि दैनंदिन गोष्टींकडे पोचले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर अनेक हिंदूंच्या वाट्याला निराशा आली. त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही इथून जा, रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब मिर्झा म्हणाले की, अल्पसंख्याकांमध्ये आता खाद्यान्नाचे गंभीर संकट ओढवले आहे. सिंधमधील मानवीय संकटाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उशीर न करता हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने सीएएचे महत्वदेखील अधोरेखीत झाल्याचे बोलले जावू लागले आहे.