भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदुर संघाच्या तीन दिवसीय वार्षीक अधिवेशनास रविवार 11 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात झाली. यावेळी कामगार कमेटीची बैठक उत्साहात पार पाडण्यात आली. यावेळी वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. आर.पी. भटनागर यांनी सेंट्रल रेल्वे युनियनच्या पदाधिकार्यांना अधिवेशनामध्ये मार्गदर्शन केले. तसेच महासचिव प्रविण वाजपेयी, कार्यकारी अध्यक्ष आर.एल.चांदुरकर, कोषाध्यक्ष रामगोपाळ निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.
वर्षभराच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला
याप्रसंगी इसीसी बँकेच्या संबधी चर्चा करण्यात आली. दुपारी ठेकेदार मजदुर संघाची बैठक संपन्न झाली. यात त्यांच्या समस्या व त्यावर उपाययोजना यावर चर्चा झाली. यानंतर वर्किंग कमेटीची बैठक झाली यात वर्षभराच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यात आला तसेच अगामी वर्षातील कामकाजांचे नियोजन करण्यात आले.
12 रोजी जनरल कॉन्सीलची बैठक
रेल्वे कामगारांच्या समस्या व त्यावरील उपाय यावर विचारविनिमय करण्यात आले.रेल्वेचे खाजगीकरणाला कठोर विरोध करण्यात आला. ठेकेदार कामागारांचे शोषण करतात ते थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ठेकेदार मजदुर संघाच्या बैठकित ठरविण्यात आले. सोेमवार 12 रोजी जनरल कॉन्सीलची बैठक होणार आहे.
युवा संमेलनाचे आयोजन
रॅली काढण्यात येवून खुले अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. यात एनएफआयआरचे महामंत्री डॉ. एम. रघुवय्या, मध्य रेल्वे विभागाचे डी.के. शर्मा, प्रकाश छाजेड व अन्य पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. 13 रोजी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनशी संलग्नील सीआरएमएसच्या मध्य रेल्वे झोन मध्ये 1 लाख 26 हजार रेल्वे कामगार सदस्य आहेत.