सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या 48 व्या वार्षिक अधिवेशनास 11 पाासून प्रारंभ

0

भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे 48 वे वार्षिक अधिवेशन 11 ते 13 डिसेंबर दरम्यान कृष्णचंद्र सभागृह तसेच रेल्वे कला मंदिर भुसावळ येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी महामंत्री डॉ. एम. रघुवैय्या व कार्यकारी अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद भटनागर यांसह राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी येथे उपस्थित राहून कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेणार आहे. 12 रोजी होणार्‍या खुल्या अधिवेशनात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा, मुख्य कार्मिक अधिकारी ब्राह्मणे, डीआरएम सुधीरकुमार गुप्ता व इतर अधिकारी उपस्थित राहतील.

अधिवेशनामध्ये 11 रोजी मुख्यालय कार्यकारिणी सभा, 12 रोजी ध्वजारोहण, जनरल कौन्सिलिंग तसेच सीईसी मिटींग, सायंकाळी 3.30 ते 6 रेल्वे स्टेशन, लोको, आंबेडकर रोड, डीआरएम ऑफिस, रेल्वे ग्राऊंडमार्गे रॅली काढण्यात येईल. यानंतर 6 वाजता कलामंदिर येथे खुले अधिवेशन व सांस्कृतिक कार्यक्रम, 13 रोजी कृष्णचंद्र सभागृहात महिला संमेलन, युवा संमेलन तथा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे संमेलन होईल. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर व भुसावळ विभागातील इगतपुरी ते अमरावती व खंडवा पर्यंतचे सीआरएमएसचे पदाधिकारी, सभासद असे दोन हजार कामगार सहभागी होती. या संमेलनात सातवे वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, रनिंग कर्मचार्‍यांच्या समस्या आदी विषयांवर ठराव होईल.