पिंपरी : निगडी एका घराचे सेंट्रिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवारी) दुपारी साडेपाच वाजता निगडी प्राधिकरण येथे घडली. सुखारी दाताई महातो (वय 50 रा. मोरेवस्ती चिखली) असे मृत मजुराचे नाव आहे. निगडीतील सेक्टर क्रमांक 25 येथे एका घराच्या दुसर्या मजल्यावर सेट्रींगचे काम करत असताना सुखारी यांचा तोल गेला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.