सेंट जोसेफ शाळेच्या विरोधात आंदोलन

0

पनवेल । नमानी कारभार करत पालक व विद्यार्थ्यांची पिळवणूक करणार्‍या नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळेच्या विरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी आंदोलन केले. वाढीव फी विरोधात पालकांनी आवाज उठवल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास व कोणत्याही प्रकारचे संरक्षण न देणार्‍या या शाळेची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी आंदोलक व शाळा व्यवस्थापनामध्ये दोनदा चर्चा झाली, मात्र सायंकाळपर्यँत योग्य तोडगा निघाला नसल्याने या मोर्चाचे स्वरूप ठिय्या आंनदोलनात झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. यावेळी शाळा व्यवस्थापनविरोधात निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर या आंदोलनात आंदोलकांकडून आक्रमकता कायम दिसून आली.