सेंट मेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग

0

भुसावळ- शहरातील सेंट मेरी स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुणांचे रंग उधळत उपस्थितांची दाद मिळवली. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, बाजार समिती सभापती सचिन चौधरी, संस्थेचे सचिव तथा जिल्हा साक्षरता समिती सदस्य गणेश फेगडे, अ‍ॅड.मनीष सेवलानी यांची उपस्थिती होती.

चिमुकल्यांनी मिळवली दाद
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलागुणांची झलक दाखवत उपस्थितांची दाद मिळवली. ‘स्वच्छ भारत अभियाना’वर आधारीत नाटीका प्रभावी ठरली. ‘स्त्री भ्रुणहत्येवरील’ गाण्याने रसिकांच्या हृदयावर छाप पाडली. विविध सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम तसेच नृत्यगीते विद्यार्थ्यांनी सादर केली. संस्थाध्यक्ष उमेश नेमाडे तसेच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य लुईझा नंदकिशोर वाढे तर सूत्रसंचालन रेचल वाढे यांनी तर आभार दिनेश वर्मा यांनी मानले. शिक्षक मिस हेमा शेट्टीया, मिस दीपमाला पोरचानी, मिस कौर, मिस मित गुजराल, राजन वाढे, लोकेश वाढे आदींनी परीश्रम घेतले.