मुंबई: तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज शेअरमार्केट पुन्हा सुरु झाले आहे. आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सेंसेक्सने १७३.२५ अंकांची उसळी घेतली आहे. त्यामुळे सध्या सेंसेक्स ३७ हजार ७५५ वर पोहोचला आहे. शेअर बाजारात सकारात्मक चित्र दिसत असल्याने सेंसेक्समध्ये वाढ होताना दिसत आहे.