‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजबद्दल काय म्हणतात राहुल गांधी

0

नवी दिल्ली-एखादी मालिका किंवा वेब सीरिज अनेकदा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरतात. सोशल मीडिया आणि देशाच्या राजकीय पटलावर सध्या एका वेब सीरिजमुळे चांगल्याच वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजविषयी प्रतिक्रिया देत एक ट्विट केले आहे. आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे असे राहुल गांधी यांनी सांगतिले आहे. यावर अनुराग कश्यपनेही प्रतिक्रिया दिली.

‘माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास आहे. स्वातंत्र्य हा मूलभूत लोकशाही अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे असे भाजपा आणि आरएसएसला वाटते. माझे वडील या देशासाठी जगले, देशासाठी त्यांनी मरण पत्करले, हे सत्य ‘सेक्रेड गेम्स’ या कल्पक वेब सीरिजमधल्या पात्रांमुळे बदलणार नाही असे  टि्वट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  केले.