हैदराबाद : हैदराबाद येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या सेक्स रॅकेटमध्ये दोन बॉलिवूड अभिनेत्रींचा समावेश असून, देहविक्रीच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. बंजारा हिल्स भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट चालवण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत दोन अभिनेत्रींसह चार जणांना अटक केली. या छाप्यादरम्यान पोलिसांना 55 हजार रूपये रोख व काही मोबाईल फोन मिळाले.
अभिनेत्रींवर शरीरविक्रयाची वेळ!
अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रींमध्ये एक बॉलिवूड अभिनेत्री तर एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचा समावेश आहे. हे रॅकेट ऑनलाईन चालवण्यात येत असून, घटनास्थळावरून दोन दलालांनाही अटक करण्यात आली होती. या दोन्ही अभिनेत्रींची ओळख उघड करण्यात आलेली नसून, त्या दोघीही मुंबईतील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सेक्स रॅकेटमधील दलाल मुंबईतील अभिनेत्रींना घेऊन इथे यायचे, असे अटक झालेल्या एका दलालाने चौकशीदरम्यान सांगितले. पंजगट्टा पोलिस ठाण्यातील अधिकारी एस. रविंदर यांनी म्हणण्यानुसार, पोलिसांना या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरूनच पोलिसांनी त्या हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यानंतर इतर हॉटेलमधून दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे, असेही पोलिसांनी सांगितले.