सेटवर रणबीरसोबत स्टंट करताना दिसली आलिया, फोटो व्हायरल

0

मुंबई : बॉलीवूडची नवीन जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. अलिकडेच आलियाला सेटवर दुखापत झाली असून तिने पुन्हा शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात आलिया रणबीरसोबत स्टंट करताना दिसत आहे. या चित्रपटात आलिया रणबीर व्यतिरीक्त महानायक अमिताभ बच्चन हेही झळकणार आहेत.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०१९ला प्रदर्शित होणार आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.