पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यात घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 30 जूनला होणार आहे. फेब्रुवारीमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून, सेटसाठीही दोनच प्रश्नपत्रिका असतील. मात्र, ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे सेट विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सेटसाठी आता 350 गुणांसाठीच्या तीन प्रश्नपत्रिकांचे रुपांतर दोन प्रश्नपत्रिकांमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली प्रश्नपत्रिका 100 गुणांसाठी, तर दुसरी प्रश्नपत्रिका 300 गुणांसाठी असेल. प्रश्नांच्या स्वरुपातही बदल करण्यात आले असून, पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी 60 ऐवजी 50 प्रश्न तर दुसर्या प्रश्नपत्रिकेत 100 गुण असतील. प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.