सेट परीक्षेतील त्रुटींबाबत माहिती द्या : खा.चव्हाण

0

पुणे । मे महिन्यात सेट परीक्षेत उत्तरपत्रिकांबाबत झालेल्या गोंधळासंदर्भात कुलगुरूंनी नेमलेल्या समितीच्या अहवालाचे काय झाले? असा प्रश्‍न खासदार वंदना चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू शाळीग्राम यांना पत्राद्वारे विचारला आहे.

या परीक्षेतील त्रुटींमुळे अन्याय झालेल्या अडीच हजार विद्यार्थ्यांना कधी न्याय मिळणार, कॅन्टीन मधील जेवण व्यवस्थेतील सुविधांमधील त्रुटी, विद्यार्थ्यांच्या होस्टेल सुविधांमधील त्रुटी असे आणि इतर अनेक प्रश्‍न शहराध्यक्ष, खासदार चव्हाण यांनी उपकुलगुरू शाळीग्राम यांना पत्रात विचारले आहेत. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मनाली भिलारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष ऋषी परदेशी आणि अशोक राठी यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींमुळे 2500 विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. तरी आपण याकडे वैयक्तिक लक्ष देऊन पाठपुरावा करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली. आपण या प्रकरणात योग्य न्याय देऊ शकण्याचे आवाहन दिल्यास विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने हितकारक होईल, असेही पत्रात नमूद केले आहे.